सर्वनाम :
सर्वनाम :
वाक्यातील नामाचा वारंवार होणारा उच्चार टाळावा म्हणून नामाच्या ऐवजी येणार्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात.
सर्वनामाचे मुख्य प्रकार सहा आहेत.
Must Read (नक्की वाचा):
वचन व त्याचे प्रकार
1. पुरुषवाचक सर्वनाम :
याचे तीन उपप्रकार पडतात.
1. प्रथम पुरुषवाचक सर्वनाम :
बोलणारा स्वत:विषयी. बोलतांना किंवा लिहितांना वाक्यामध्ये ज्या सर्वनामाचा उपयोग करतो त्यास प्रथम पुरुषी सर्वनाम असे म्हणतात.
उदा – मी, आम्ही, आपण, स्वत: इ
2 .व्दितीय पुरुषवाचक सर्वनाम :
जेव्हा बोलणारा ज्यांच्याशी बोलावयाचे आहे. त्याचा उल्लेख करतांना वाक्यामध्ये ज्या सर्वनामाचा उपयोग करतो त्या सर्वनामास व्दितीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात.
उदा – तो, तुम्ही, आपण, स्वतः इ
3. तृतीय पुरुषवाचक सर्वनाम :
जेव्हा बोलणारा दुसर्या व्यक्तीशी बोलतांना व तिसर्या व्यक्तींचा उल्लेख करतांना ज्या, ज्या सर्वनामाचा वाक्यात उपयोग करतो त्या सर्वनामांस तृतीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात.
उदा – तो, ती, ते, त्या, आपण, स्वतः इ.
2. दर्शक सर्वनाम :
जवळची किंवा दूरची वस्तू दाखविण्याकरीता जे सर्वनाम वापरले जाते. त्यास दर्शक सर्वनाम म्हणतात.
उदा – हा, ही, हे, तो, ती, ते.
3. संबंधी सर्वनाम :
वाक्यात पुढे येणार्या दर्शक सर्वनामांशी संबंध दाखविणार्या सर्वनामाला संबंधी सर्वनाम असे म्हणतात.
उदा – जो, जी, जे, ज्या
– ही सर्वनामे मिश्र वाक्यातच येतात.
– ही सर्वनामे गौणवाक्याच्या सुरवातीलाच येतात.
– असे गौण वाक्य हे गौण वाक्याचे विशेषण हे प्रकार असते.
– ही सर्वनामे गौणवाक्याच्या सुरवातीलाच येतात.
– असे गौण वाक्य हे गौण वाक्याचे विशेषण हे प्रकार असते.
4. प्रश्नार्थक सर्वनाम :
ज्या सर्वनामाचा उपयोग वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी केला जातो त्या सर्वनामास प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात.
उदा – कोण, कुणास, काय, कोणी, कोणाला
5. सामान्य / अनिश्चित सर्वनाम :
कोण, काय, कोणी, कोणास, कोणाला, ही सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता ती कोणत्या नामाबद्दल आली आहे ते निश्चित सांगता येत नाही तेव्हा त्यांना अनिश्चित सर्वनाम म्हणतात.
उदा.
6. आत्मवाचक सर्वनाम :
एकाच वाक्यात आधी आलेल्या नामाचा किंवा सर्वनामाचा पुन्हा उल्लेख करतांना ज्या सर्वनामाचा उपयोग होतो. त्याला आत्मवाचक सर्वनाम असे म्हणतात.
उदा.
मराठीत मूळ 9 सर्वनाम
मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतःया मूळ सर्वनामापैकी –
लिंगानुसार बदलणारी तीन सर्वनाम आहेत – तो, हा, जो.
मूल सर्वनामापैकी वचनानुसार बदलणारी पाच सर्वनामे आहेत. – मी, तू, तो, हा, जो इ
खुप छान माहिती आहे मी पन थोडी लिहली आहे. वाचा मराठी व्याकरण
ReplyDelete